top of page

सकारात्मक दाद

कशासाठी?

लर्निंग आऊटकमसोबत जोडलेले व्हिडिओज्

हे मुलांच्या ॲक्टिव्हिटीज् चं प्रदर्शन नाही. हे

प्रत्येक ॲक्टिव्हिटीज् चं पॉझिटिव्ह अप्रेजल आहे.

हे फक्त पालकांसाठी आहे. या माध्यमातून मुलांनी केलेल्या कामावरची सकारात्मक दाद पालकांपर्यंत पोहोचवण्याचे काम अनबॉक्स करतो. यामुळे इतरांशी तुलना करण्याची इथे अपेक्षाच नाही. तसेच तुलनेमुळे येणाऱ्या अहंगंड किंवा न्यूनगंड या भावनांनाही येथे थारा नाही. उलट आपले मूल इतरांसारखेच एक असणे

स्वीकारण्याची, नॉर्मलसीचे स्वागत

करण्याची क्षमता पालकांमध्ये

यावी असा हेतू आहे.

अनबॉक्स काय आहे ?

• अनबॉक्समध्ये मुलांसाठी दर आठवड्यात एक याप्रमाणे ४० ॲक्टिव्हिटीज् आहेत, ज्या मुलांना स्वतंत्रपणाने विचार करण्यास प्रोत्साहित करतात. अनबॉक्स शिकवण्याकरता नसून शिकण्याकरता आहे.

• अनबॉक्सनी आवश्यक ती साधनं दिली आहेतच, पण त्यातील कुठल्याही साधनावर अनबॉक्सचा मालकी हक्क नाही. बाजारात सहज विकत मिळतील असेच सारे मटेरियल यात वापरले आहे. त्यामुळे एखादे साधन संपले, तुटले किंवा हरवले तरी थांबायचे कारण नाही. बाजारात जाऊन आणू शकू अशा वस्तूच साधनं म्हणून आम्ही वापरली आहेत.

• ॲक्टिव्हिटिज् साठीचं साहित्य वापरताना मुलांना सहजता आणि साधेपणा वाटावा म्हणून हे साहित्य हातांनीच बनवलेलं आहे.

• मुलांनी क्राफ्टमध्ये गुंतू नये म्हणून काही गोष्टी मुद्दाम तयार करूनच दिल्या आहेत. अशा ॲक्टिव्हिटीज् मध्ये हस्तकौशल्यापेक्षा विचारांना अधिक महत्त्व असणार आहे.

• ॲक्टिव्हिटीज् मधून काही कलाकृती निर्माण होतीलच असे अजिबात नाही. ही मुलांची व्यक्त होण्याची जागा आहे.

ॲपमध्ये काय आणि ते कसे वापरावे ?

• ॲप पालक आणि अनबॉक्स यांच्यामधील संवादाचे साधनमात्र आहे.

• ॲक्टिव्हिटीज् करण्यासाठी असलेला इन्स्ट्रक्शन ऑडिओ हा फक्त मुलांसाठीच आहे. मुलांनी काय करायचे आहे हे त्यात सुचवले आहे. यातून पालकांनी त्यांच्या समजुतीप्रमाणे अर्थ काढून मुलांपर्यंत पोहोचवणे अपेक्षित नाही. मुले आपल्या आकलनानुसार ॲक्टिव्हिटीज् करतील यावर विश्वास असायला हवा.

• दोन ॲक्टिव्हिटीज् मधला कालावधी हा मुलांना केलेल्या कामात रमण्यासाठी, त्यातून होणाऱ्या स्वयंशिक्षणासाठी, त्याकडे वेगवेगळ्या दृष्टीकोनातून बघून वेगवेगळे परिणाम साधण्यासाठी पुरेसा अवकाश देतो. हे अंतर पाळले जावे म्हणून आणि केवळ म्हणूनच तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. अन्यथा मुलांची कुठलीच ॲक्टिव्हिटी तंत्रज्ञानावर अवलंबून नाही. ॲप केवळ पालकांसाठी आहे.

• मुलांच्या कामांचे फोटो आणि व्हिडीओज् काढून अपलोड करण्याची सोय ॲपमध्ये आहे. तसेच हे अपलोड केल्यानंतर त्या ॲक्टिव्हिटीचे लर्निंग आऊटकम तुमच्या ॲपवरून ऐकायला आणि वाचायला मिळेल.

लर्निंग आऊटकमकडे कसे बघावे ?

• ठराविक कृतीतून ठराविक परिणाम साधणे हे प्रशिक्षण. पण शिक्षण म्हणजे मुलांनी केलेल्या छोट्या-मोठ्या कुठल्याही कृतीतून विचार निर्माण करण्याचं काम. अनबॉक्स हे काम करतो. आणि हा विचार पालकांपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम म्हणजे लर्निंग आऊटकम.

• लर्निंग आऊटकम हे मुलांच्या कामाचे मूल्यमापन नाही. तर मुलांच्या शिकण्याचा जागा समजून घेण्याची ही संधी आहे. 

• मुलांच्या कामात मोठ्यांच्या कामाप्रमाणे अचूकता, बारकाई, नेमकेपणा, शिस्त असे काहीही नसणार. लर्निंग आऊटकम ॲक्टिव्हिटीज् च्या परिणांमाविषयी नाहीच, तर मुख्यत: शिकण्याच्या प्रक्रियेबद्दल बोलतो.

• अनबॉक्सची कुठलीच ॲक्टिव्हिटी ही काय शिकावे यासाठी ठरवून योजलेली नाही. पण  ॲक्टिव्हिटी करताना मुले काय शिकतील याची निरीक्षणं इथे मांडलेले आहेत. अर्थातच, परिणामांपेक्षा प्रक्रिया महत्त्वाची!

• लर्निंग आऊटकमसाठी उपयोगात आणलेला अभ्यास हा वेगवेगळ्या संशोधनांवर आधारित आहे. हे रिसोर्सेस आणि या साऱ्यांचे संदर्भ अनबॉक्सच्या साईटवर दिले आहेत. वेळोवेळी त्यात भरही टाकली जाते.

• लर्निंग आउटकमची योजना फक्त पालकांसाठी आहे, ती मुलांना ऐकवू नये. 

bottom of page